• Logo
  • 868686 63 85
  • IN     
  •      
  • OUT     
No
No


slider

भोगावटा १ आणि भोगवाटा २ मधील फरक ७/१२ च्या अर्कवर: -


भोगावटा १ आणि भोगवाटा २ मधील फरक ७/१२ च्या अर्कवर


भोगावटा 1: -


              जो खातेदार फार पूर्वी पासून जमिनीचा कब्जेदार असून त्याला सदर जमिन विकण्याचा पूर्ण अधिकार बहाल केला आहे. अशा जमीनींचा खातेदाराचा वर्ग 1 मध्ये समावेश होतो. या जमिनी विक्री / हस्तांतरण कामी कोणत्याही शासकीय पूर्वपरवानगीची गरज नाही. थोडक्‍यात, मुळ मालकीची वडलोपार आलेली जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये असते.भोगावटा 2: -


              ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार बहाल केला नाही.असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 होय. उदा. देवस्थान इमानी जमीन,हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो.अशा जमीनी विक्री साठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.


PropReader.com
Visit Us https://propreader.com/

जमीन घेताना खालील बाबी काटेकोरपणे पालन करावे :-

1. जमीनीचा उतारा पाहून त्यावरील भूधारना पद्धतीत कोणता शेरा आहे हे पहावे. जर त्यात भोगवटादार वर्ग 2 किंवा न.अ.श असा शेरा आला की सदर जमीन ही शासनाच्या पूर्व परवानगीनेच खरेदी करावी लागेल हे नी निश्चित करावे.

2. जमीन भोगवटादार वर्ग 2 ची आहे. परंतू ती कोणत्या प्रकारात आहे हे पहावे.उदा. सिलिंग जमीन, प्रकल्पग्रस्ताची जमीन, सैनीकाची जमीन, आदिवासी जमीन, कुळ जमीन इ. हे पहाण्यासाठी 7/12 वरील इतरहक्क मालकी हक्क नावे पहावे.

3. जर 7/12 वरून जमीन वर्ग-2 ची आहे परंतू ती कोणत्या प्रकारची आहे हे कळत नसेल तर तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयातून सदर जमीनीचा प्रवर्ग कोणता आहे हे तपासवे.

4. देवस्थान महसूल माफीची जमीन, वन जमीन, गायरान जमीन या जमिनीची खरेदी विक्री व्यवहार होत नाहीत. अशा जमिनींच्या बाबत कोणताही व्यवहार करू नये.

5. ज्या खातेदारची आपण घेणार आहोत त्या खातेदाराच्या सर्व वरसांचे नाहरकत व परवानगी किंवा इतर नोंदणीकृत दस्ताने परवानगी घेणे आवश्यक आहे.

GoBringerTechnologies.com
Visit Us https://www.gobringertechnologies.com/

6. भोगवटादार वर्ग 2 चा खातेदार भूमिहीन होणार नाही अशा पद्धतीने जमीन खरेदी करणे केव्हाही चांगले.कारण जर तो भूमिहीन झाला तर कालंतराने वाद उभा राहू शकतो.

7. भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीची खरेदी व आदिवासी खातेदाराची जमिनी खरेदी याबाबत कायदे वेगवेगळे आहेत. आदिवासी खातेदाराची जमीन खरेदी करण्यासाठी शासनस्तरावरून मंजूरी लागते.

8. आदिवासी खातेदाराची जमनी स्वतात मिळते म्हणून शासनाचा पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही मार्गाने ती घेण्याचा प्रयत्न करू नये.भोगवटादार वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये रूपांतर :-


              प्रारंभाच्या दिनांकास किंवा भोगवटादारास नवीन व अविभाज्य शर्तीवर/ भोगवटादार वर्ग 2 धारण केलेला असा कोणताही भोगवटा, अशा जमिनीच्या चालू बाजाराच्या पन्नास टक्के इतकी रक्कम यनजराणा म्हणून शासनाला प्रधान करून भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतर करता येईल.आणि अशा रूपांतरानंतर भोगवटादार , महारास्ट्र जमीन महसूल सहिता 1966 याच्या तरतुदी अशी जमीन भोगवटादार वर्ग 1 म्हणून धारण करील.helloregistration.com
Visit Us https://www.helloregistration.com/


सुरक्षित मालमत्ता कशी शोधावी

मालमत्ता सुरक्षित आहे की नाही हे शोधू इच्छित आहे .. कसे ?? येथे शोधा

पुढे वाचा

आपली मूळ कागदपत्रे जाणून घ्या

आपले कागदपत्रे मूळ आहेत की बनावट आहेत हे तपासण्यात आम्ही आपल्याला मदत करतो

पुढे वाचा

आपल्या मालमत्तेचे मूल्यांकन

आम्ही आपल्या मालमत्तेचे एकूण मूल्यांकन मोजण्यात मदत करतो

पुढे वाचा

75000

+

Clients

9

+

Year Experience

18000

+

Regular Clients

365

Days

Online Status Update

ब्लॉग

खाली काही मालमत्ता संबंधित ब्लॉग्ज दिले आहेत..ते पाहा ...

View More Blogs

आम्हाला का निवडा